कवयित्रि इंदिरा संत :-
कवयित्रि इंदिरा संत यांच्या कविता मला नेहमीच भावतात. विसाव्या शतकातील एक अतिशय प्रगल्भ , संवेदनशील, निसर्ग विषयक प्रतिमा अतीशय सहज आपल्या भाव अनूभुतीतून व्यक्त करताना दिसतात. अनेक कवितासंग्रह, ललित, कथा,लेख संग्रहाच्या स्वरूपात प्रकाशित झालेले यांचे लेखन. विशेषतः मला भावतात त्या इंदिरा संत यांच्या कविता. पाॅप्युलर प्रकाशनने अखंड काव्यसंग्रह प्रकाशित केलेला साहित्य रसिक वाचकांसाठी अतीशय उपयुक्त असा हा काव्यग्रंथ आहे.आपण सुरवात करुया त्यांच्या एका सुंदर बाल कवितेद्वारे खरंतर बालकविता, कुमार वयातील अल्लड भाव, तारूण्य सुलभ नव तारूण्यातील अवखळ भाव प्रेम, विरह, हुरहुर आणि अतिशय तरल संवेदनशील मनातील भावतरंग कवयित्रि इंदिरा संत यांनी आपल्या काव्यातून अतीशय साध्या सोप्या शब्दातून काव्य पुष्प वेलीत गुंफले आहेत.
गवतफुला
रंगरंगुल्या,सानसानुल्या,...गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,सांग तुझा रे तुझा लळा.
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरुन गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.
मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरुन शाळा,घर सारे.
अतीशय तरल गवत फुले ही कविता इंदिरा संत यांची. याच बरोबर मला भावलेली.." उंच उंच माझा झोका " ही कविता.एक मुलगी, नवयुवती, प्रेमिका, पत्नी ,आई आणि जीवनअनुभव या सर्वांच्या सोबत जीवन जगताना..त्यांचा ना.मा.संत याबरोबर झालेला प्रेम विवाह. सासर माहेर या वाटेवरील भाव आंदोलनं आठवणी.ना.मा.संत यांच्या अकस्मात निधनाचे दुःख .विरह प्रेम आठवणी व यातून बाहेर पडताना व संसारा मधे मन गुंतलले असतानाची भाव आंदोलने अतीशय हळुवार पणे व्यक्त केली आहेत आपल्या कवितेतून...
उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला
झोका चढता-उतरता झाला पदर वारा वारा
झोक्याला देते वेग पाय टेकून धरणीला
लाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलाला
झोका चढतो पूर्वेवर, जाईजुईंनी सावरीला
दंवा-धुक्याचा शुभ्र साज अंगावरती चढविला
झोका चढतो पश्चिमेला, वेल लालन देते तोल
मोकळ्या केसांमधे गुंफी सनया लाललाल
झोका चढतो उंच उंच, पाय पोचती मेघांवरती
इंद्राच्या डोहावरी लाल पाखरें पाण्या येती
झोका चढतो उंच उंच, मला थांबता थांबवेना
गुंजेएवढे माझे घर त्याची ओळख आवडेना..
४ जानेवारी १९१४ रोजी विजापूर जिल्ह्यात इंडी येथे इंदिराबाईंचा जन्म झाला. १३ जुलै २००० रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी बेळगाव येथे वृध्दापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना कवी व निबंधकार श्री. ना.मा. संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रथम प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांनी १९७२ सालापर्यंत काम केले. महाविद्यालयात असल्यापासूनच त्या कविता करत होत्या आणि त्या ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा वगैरे मासिकातून प्रसिध्द होऊ लागल्या होत्या. १९४१ मध्ये ‘सहवास’ हा उभय पतीपत्नींचा कवितासंग्रह प्रसिध्द झाला.
‘स्वत्वाने सुंदर ठरलेली विशुध्द भावकविता’ ....असे इंदिराबाईंच्या कवितेचे वर्णन केले जाते. आत्मनिष्ठ भावानुभवांची अत्यंत प्रत्ययकारी चित्रणे,त्यांच्या कवितेत सहजपणे रेखाटली जातात. सहवास हा ना.म.संत व इंदिरा संत यांचा एकत्रीत काव्यसंग्रह प्रसिध्द झालेला..
त्यानंतर शेला (१९५१) मेंदी(१९५५) मृगजळ (१९५७) रंगबावरी (१९६४) बाहुल्या (१९७२) गर्भरेशीम (१९८२) चित्कळा (१९८९) वंश कुसुम (१९९४) व निराकार (२०००) असे नऊ स्वतंत्र कवितासंग्रह पन्नास वर्षाच्या कालखंडात प्रसिध्द झाले. शामली (१९५२) कदली (१९५५) चैतू (१९५७) हे तीन कथासंग्रह, मृद्गंध (१९८६) मालनगाथा (१९९६) फुलवेश (१९९७) हे तीन ललितलेख संग्रह, गवतफुला, अंगतपंगत, मामाचा बंगला हे बालसाहित्य- असे विविध प्रकारचे गद्यलेखनही त्यांनी केले. त्यांच्या गद्यलेखनाचे स्वरूपही कवितेसारखे नितळ, सहजसुंदर व काव्यात्मक आहे, त्यामुळे साहजिकच कवी म्हणून इंदिराबाईंचा ठसा साहित्यक्षेत्रावर अधिक उमटला.
इंदिरा संत यांच्या शेला, मेंदी, रंगबावरी या कवितासंग्रहांना राज्यशासनाचे पुरस्कार लाभले तर गर्भरेशीमला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. १९९५ साली तिसरा जनस्थान पुरस्कार लाभला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्तीही लाभली आहे.
काव्य दिंडी या उपक्रमा अंतर्गत वसुधा ताईंनी सहभागी करुन घेतले.या काव्य दिंडीची एक भोई होण्याचा मान स्विकारून ही दिंडी पुढे मी नेत आहे.आपले कवी मित्र दिलीप धामणे सर , संतोष घुले सर व नीलू मानकर यांनी या काव्य दिंडीचे भोई होऊन आपण या दिंडीला..पुढच्या प्रवासा साठी खांदा दयावा..यासाठी मी त्यांना आमंत्रित करते वआपल्या दोन मित्रांना आमंत्रित करावे अशी मी त्यांना विनंती करते..
--सौ. तनुजा ढेरे