‘ मंतरलेली उन्हे ’ हा तनुजा ढेरे यांचा लेखसंग्रह वाचकाला त्या लेखांसह त्यांच्या बालपणाच्या गांवी, आजोळगावी, तिथल्या शेतीमातीत, निसर्गात झाडाफुलांमधे, वाड्यावस्त्यांमधे फिरवून आणतो. तिथलं ऋतुसौंदर्य, सणसमारंभ, तिथली माणसं वाचकाला त्या आठवणींमधे गुंतवून ठेवतात. मुक्त आनंदी निसर्गाच्या सानिध्यात बहरणारं सहज स्वाभाविक बालपण, तारूण्यसुलभ वृत्ती या साऱ्याशी निगडीत आठवणींही मूळ सौंदर्यानिशी लेखनीतून उतरतात. कवयित्रिही असलेल्या या लेखिकेच्या सौंदर्यानुभूती देणाऱ्या सुंदर कविताही जागोजागी चमचमत राहतात व ललितगद्याच्या या मोकळ्या ढाकळ्या प्रकृतीत सहज सामावून जातात.अतिशय देखणी निसर्गचित्रे व ठसठसशीत व्यक्तिचित्रे शब्दांनी जिवंत चित्रीत करणं ही लेखिकेची खासियत आहे. लेखिकेच्या अंगी जे सृजन सामर्थ्य आहे त्याचा अविष्कार या सुंदर ललित गद्यलेखनात झालेला आढळतो.
माधवी कुंटे
