ऋतू
प्रत्येक ऋतू नव्याने बहरतो तुझ्या सोबत जगताना
कळत सुध्दा नाही तुझ्यात रमताना...
कधी रिमझिम...रिमझिम
तर कधी मुसळधार धो धो कोसळणारा पाऊस
घट्ट बिलगणारा
तर कधी दाट धुकं गर्द रेशमी मंथरलेलं..
श्वासात मिसळताना हळुच निसटणारं
पानगळ होतानाची उदासी..
पुसट होताना...
तांबूस मखमली लव अंगावर...
भुरकट होताना
ऊन तांबडं ताबडं ...
निळ्या निळ्या नदीच्या डोहावर शांत पहुडलेलं..
कधी कधी खळखळुन हसणारं
संथ संथ होत जाताना निर्विकार भासणारं
नदीचा गुढ तळ पाहताना
खरच कळत सुध्दा नाही..
कधी मनाचा तळ वर वर भरत जातो
अन भरुन वाहताना
रिता रिता होत जातो
तुझ्या सोबत जगताना..
सौ. तनुजा ढेरे
प्रत्येक ऋतू नव्याने बहरतो तुझ्या सोबत जगताना
कळत सुध्दा नाही तुझ्यात रमताना...
कधी रिमझिम...रिमझिम
तर कधी मुसळधार धो धो कोसळणारा पाऊस
घट्ट बिलगणारा
तर कधी दाट धुकं गर्द रेशमी मंथरलेलं..
श्वासात मिसळताना हळुच निसटणारं
पानगळ होतानाची उदासी..
पुसट होताना...
तांबूस मखमली लव अंगावर...
भुरकट होताना
ऊन तांबडं ताबडं ...
निळ्या निळ्या नदीच्या डोहावर शांत पहुडलेलं..
कधी कधी खळखळुन हसणारं
संथ संथ होत जाताना निर्विकार भासणारं
नदीचा गुढ तळ पाहताना
खरच कळत सुध्दा नाही..
कधी मनाचा तळ वर वर भरत जातो
अन भरुन वाहताना
रिता रिता होत जातो
तुझ्या सोबत जगताना..
सौ. तनुजा ढेरे
