●●●
अभिजात
●●●
जगणं सुंदर आहे
===========
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे
डोळे भरून
बघणं सुंदर आहे !
तुझी हाक
तळ्यावरून येते
वा-याच्या
मळ्यावरून येते
थरारून
ऐकणं सुंदर आहे
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे
डोळे भरून
बघणं सुंदर आहे !
मातीच्या
ओल्या ओल्या वासात
वा-याच्या
खोल खोल श्वासात
झाडांचं
भिजणं सुंदर आहे
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे
डोळे भरून
बघणं सुंदर आहे !
फुलांचे
वास विरून जातात
दिलेले
श्वास सरून जातात
असण्याइतकंच
नसणं सुंदर आहे
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे
डोळे भरून
बघणं सुंदर आहे !
●●●
मंगेश पाडगावकर
●●●
साहित्य हे कालातीत असते. काळाच्या ओघात त्यातील महत्त्व, गोडवा कधीही कमी होत नाही, म्हणून तर त्याला ‘अक्षर वाङ्मय’ म्हटले जाते. या साहित्याच्या महत्तेचा परिचय सर्वसामान्य रसिकांना करून देणारे जीवन म्हणजे मंगेश पाडगावकर! पाडगावकरांचे लिखाण कधीही कालबाह्य झाले नाही. काळाच्या वळणाबरोबर, जीवनाच्या नव्या-नव्या प्रवाहाबरोबर त्यांचे लिखाण ताजे होत गेले. त्या-त्या काळातील तरुणांना, लहान मुलांना, प्रौढांना आपल्या भावविश्वाचेच वर्णन वाटावे, असा जिवंतपणा मंगेश पाडगावकरांच्या कवितेत सतत प्रकट होत गेला. पाडगावकरांच्या कविता वाचताना, ऐकताना ‘हे तर अगदी माझ्या मनातलं आहे,’ असा भाव प्रत्येकाच्या मनात उमटेल, असं सामर्थ्य त्यांच्या साहित्यात होतं. कविता आणि गाणं असा भेद खरे म्हणजे असता कामा नये. गाण्याला दुय्यम स्थान देत कवितेला श्रेष्ठत्त्व देत सोयीने समीक्षक हा भेद मांडत असतात. मराठी मुलखाचं भविष्य ज्यांच्या सुमधूर गाण्यांनी तरुणांच्या ओठावर आणलं आहे त्या भाग्यविधात्यांमध्ये मंगेश पाडगावकर यांंचं स्थान ङ्गार वरचं आहे. कविता आणि गाणे यातील सीमारेषा संपवून टाकण्याचे सामर्थ्य ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर अशा मराठी कविपरंपरेने दाखवून दिले आहे. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे... ’ अशा अनेक गेयतापूर्ण रचनेतून जीवनाचं आशावादी तत्त्वज्ञान सहजपणे मांडण्याचं काम पाडगावकरांनी केलं आहे. ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत’, ‘आनंदयात्री मी आनंदयात्री’ अशा अनेक कवितांमधून जीवनाकडे पाहण्याचा जो एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे, तो रसिकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारा आहे.
बालसाहित्यात नेहमीच बालकांच्या भावविश्वाचा विचार केला जात नाही. ‘किनई’, ‘जम्माडी जम्मत’ अशा शब्दांनी सुरुवात करून पुढे काहीही लिहिलं की, ते ‘बालवाङ्मय’ होतं, असं यात मुशाङ्गिरी करणार्या अनेकांना वाटतं. अनेकांना बालकांना उपदेशाचे डोस पाजणे म्हणजे बालसाहित्य वाटते. मात्र, पाडगावकरांनी मुलांचे भावविश्व लक्षात घेऊन बालकविता केल्या आहेत. ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल काय... ’ ही कविता मुलांचे भावविश्व त्यांनी कसे मांडले ते सांगण्यास पुरेशी आहे. अनेक बालकवितांमधून मुलांचे भावविश्व मुलांना गंमत वाटेल, अशा कल्पना, शब्द वापरून त्यांनी अशा काही मांडल्या आहेत की, मोठ्यांनाही त्या कविता वाचताना त्यांच्या बालपणात गेल्याचा आनंद मिळेल. या बालकवितांना आपल्या शब्दसामर्थ्याने एक ‘नाद’ त्यांनी दिला आहे. ‘कवितेमधील सर्व प्रकार हाताळणारा अष्टपैलू कवी,’असे पाडगावकरांंबाबत म्हणावे लागेल. ‘दासबोधा’प्रमाणे नव्या काळातील संदर्भ असलेला नर्म उपहास करणारा ‘उदासबोध’ त्यांनी लिहिला. अनुवादामध्ये त्यांनी मीरा, कबीर, सूरदास यांचे अभंग भाषांतरित केले. बायबलचे मराठी भाषांतर त्यांनी केले. पाडगावकर केवळ लिहिणारे कवी नव्हते, तर ते कविता सादर करणारे कवी होते. कवितेचे सादरीकरण असे असले पाहिजे हे जणू त्यांनी मराठी रसिकांना दाखवून दिले. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर या तिघांनी कवितेचे सादरीकरणाचे कार्यक्रम गावोगावी करत मराठी रसिकांच्या मनावर कविता कोरण्याचेच काम केले. महाविद्यालयात, मैदानात, गावात हजारो लोकांसमोर कविता सादर करताना ‘सलाम,’ ‘दिवस मावळण्याआधी रात झाली’ अशा कवितांना रसिकांची प्रचंड दाद मिळत असे. तरुणांना ‘प्रेम’ या भावनेचं प्रचंड आकर्षण असतं. प्रेम ही एक पवित्र, तरल, संवेदनशील भावना आहे. प्रेम हे आंधळं असतं. प्रेमाच्या विषयात कोणत्याच भेदांना स्थान नसते. वगैरे वगैरे... अशा ‘प्रेम’ या विषयावरच्या असंख्य भावना व्यक्त करताना ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...’ हे पाडगावकरांनी लिहिलेले मोजके पण चपखल शब्द प्रेमदुनियेत अजरामर झाले आहेत. ‘यांचं असं का होतं कळत नाही, यांना कळतं पण वळत नाही...’ ही केवळ कविता नाही, तर दोन पिढ्यांमधील अंतर सहजपणे मांडणारी एक उपहासगर्भ, नर्मविनोदी रचनाच आहे.
वयाच्या मर्यादा ओलांडून पाडगावकरांचं नातं तरुणाईशी निर्माण करणार्या अशा अनेक कविता पाडगावकरांनी केल्या आहेत. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडण्याचं पाडगावकरांचं सामर्थ्य इतकं होतं की, जाहिराती तयार करताना नव्या काळात पाडगावकरांची शब्दयोजना अनेक जाहिरातींना लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करून देणारी ठरली आहे. साहित्य ही एक चळवळ आहे. तो केवळ स्वान्तसुखाय उद्देशाने लोकांनी केलेला शब्दांचा खेळ नाही. याची जाणीव ठेवून नव्या कवींना प्रोत्साहन देणे, नवोदित साहित्यिकांना पत्रे लिहून दाद देणे, दिवाळी अंकांना पत्रे लिहून अभिप्राय कळविणे, ज्यांना गुरू मानले त्या बा. भ. बोरकरांचे समग्र वाङ्मय संकलित करण्यासाठी धडपड करणे, अशा त्यांच्या अनेक गोष्टी मराठी सारस्वताच्या क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरल्या. सर्वसामान्य माणसे असे समजतात की, साहित्यिकाकडे जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी असते. ‘जो जे पाहे न रवी, तो ते पाहे कवी’ अशा रचनेतून हे कवीचे असामान्यत्त्व व्यक्त झाले आहे. असे असले तरी सामान्य माणसांच्या नजरेतून घटनांकडे पाहण्याची आणि त्यावरचे भाष्य सामान्यांच्याच भाषेत सहजपणे मांडण्याची एक असामान्य हातोटी पाडगावकरांकडे होती. ‘सलाम’ ही कविता म्हणजे आणीबाणीसारख्या प्रसंगात, त्यानंतरही सत्तेच्या साठमारीत, चंगळवादाच्या झंझावातात सामान्य माणसाची स्थिती, त्यावर या सामान्य माणसाचे परखड स्वगत मांडणारी एक अजरामर कविता आहे. ही कविता लिहिल्यानंतर अनेक वर्षांनंतर आजही त्यातील वर्णन केलेली सामाजिक स्थिती बदललेली नाही. मात्र, आपली कविता कालातीत ठरल्याचा आनंद न मानता ती विदारक परिस्थिती इतक्या वर्षांनंतरही कायम राहिली, याचा विशाद व्यक्त करण्याचा मनाचा मोठेपणा पाडगावकरांच्याकडे होता. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकविणारा, जगण्यावर प्रेम करायला शिकविणारा, सतत काळाबरोबर राहणारा हा आनंदयात्री आता विसावला आहे. वेदनेला शब्द देणार्या, भावनेला सहज मांडणार्या, शब्दांना गेयता देणार्या, गाण्याला जगणं आणि जगण्याचं गाणं करणारे हे आनंदयात्री आजही आपल्यात आहेत.
संदर्भ -- संग्रहीत लेख /कविता.

No comments:
Post a Comment