दिवाळी अंक - २०१८
दिवाळी अंकाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कितीतरी दिवाळी अंक आपल्या आजुबाजूला दिसतात. महाराष्ट्रातील दिवाळी अंकाना शंभर वर्षाची परंपरा लाभलेली आहे या दिवाळी अंकाचा विचार करता दरवर्षी हजार ते बाराशे दिवाळी अंक निघतातच. मुंबई ठाणे, पुणे येथूनच शे- पाचशे अंक निघत असतील.
मौज, दीपवाली, महाराष्ट्र टाईम्स, हंस, कालनिर्णय, ऋतुरंग, सकाळ, जत्रा इ. दिवाळी अंकाच्या परंपरेत... आता अनेक जिल्हयातून, विभागातून दर्जदार दिवाळी अंक निघत आहेत.
अनेक साहित्यिक दिवाळी अंकाची मेजवाणी आपण रसिक चाखत आहोत त्यात वाघूर, साहित्यसेतू, अक्षरवेध, अधोरेखीत इ. अनेक नवनविन दिवाळी अंकातून अनेक नवोदित लेखक कवींना स्थान मिळतंय. अनेक लेखकही पुढे येऊन संपादनाचं काम करतायेत ही खूप आशाजनीक गोष्ट आहे. पारंपारिक ठरलेली प्रस्थापित लेखकांची चौकट मोडून काही दर्जदार दिवाळी अंक नवनविन लेखकांना त्यांच्या अंकात सामावून घेताना लेखक वर्गाला प्रोत्साहन देत आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे
एका वाचकाच्या भूमिकेतून दिवाळी अंकाचा विचार करताना रसिक वर्गाला काय हवंय हे खरंतर खूप महत्वाचं असतं व हे ओळखण्यातच संपादक व लेखक वर्गाचं खरं कौशल्य आहे. मनोरंजन की मेंदूला पौष्टीक खुराक हवा या अंगाने विचार करायला हवा. आताचा वाचक वर्ग हा खूप सजग आहे. नुसता अंक देखणा असून उपयोग नाही तर त्यातील मजकूर लेखन हे सकस हवं.
आजच्या दिवाळी अंकाचा विचार करता यात प्रामुख्याने लेखकांची भूमिका/ कविची भूमिका वा मान्यवर कलाकार व व्यक्तीची भूमिका खूप महत्वाची वाटते. कथा / ललितलेखन/ मुलाखत/ माहितीपर / लघुकादंबरी, दीर्घ कथा, शब्दमर्यादा इ. विविध दालनं लेखकांसमोर आता खुली आहेत.
खरंतर दिवाळी अंक निर्मितीत लेखकासमोरची आव्हाने कोणती ? लेख वेळेत पाठवणे हे लेखकांसमोरचे मोठे कसब आहे? लेख कथा पाठवल्यानंतर पोहच पावती मिळेलच याबाबतीत लेखक नेहमी साशंक रहातो. लेख -कथा छापून आली तरी कित्येक वेळा अंकच पोहचत नाही त्या लेखकांपर्यंत. तिऱ्हाईत व्यक्तीकडून माहिती कळते की आपला लेख छापून आलाय. पारदर्शकता यायला हवी या सर्व व्यवहारामधे. अंक विकत घेतल्यावर काय आपण काय वाचतो. चाळून तसाच ठेवतो अंक की खरंच वाचतो प्रत्येक वाचक हाही प्रश्न नेहमीच मला पडतो.
प्रकाशका समोरची / संपादका समोरची आव्हाने ?
छपाई / लेखन निवडणे /
संपादक
^
लेखक/ कलाकार
^
चित्रकार
^
रेखाटनकार
^
वाचक
^
विक्रेता/ प्रकाशक
दिवाळीअंकात ज्या लेखक / कवींने लेखन केले आहे तो अंक त्याला विकत घ्यावा लागतो की संपादक पाठवतो ? लेखक/ कवी किती अंक विकत घेतात. सर्वसाधारण दिवाळी अंक वाचल्यावर आपल्याला काय वाटते ? हेही प्रश्न आहेत.
दिवाळी अंकाचे विविध प्रकार ; एकाच विषयाला वाहिलेले दिवाळी अंक उदा : नोबेल लेखक इ. आरोग्यविषयक, फराळ व रेसपी खेळ, साहित्य इ. अनेक विषय व आशय हाताळलेले अंक- पद्मगंधा, बालसाहित्यविषयक दिवाळी अंक - किशोर, स्त्रीवर्गासाठी असलेले अंक - शब्दशिवार स्त्री कथा विशेंषाक, मनोरंजनपर हास्य व विनोदी कथा विशेष अंक..
कुबेर दिवाळी अंक - अभासी जगातून आकारास आलेलं वास्तव तितकंच प्रखर व सौम्य...शब्दातून मांडणारा हा दिवाळी अंक
संचार - साहित्य व राजकारण व समाजकारण सर्व अंगाना स्पर्श करणारा दिवाळी अंक
अश्लेषा दिवाळी अंक -
शब्दशिवार - कथा विशेंषाक सप्तर्षी प्रकाशन
कुसुमाकर - श्याम पेंढारी
आणि आता उत्सुकता आहे ती झपुर्झा दिवाळी अंक वाचण्याची...
तनुजा ढेरे

No comments:
Post a Comment