सोसेल इतकंच सोशल व्हावं
एक वेळ जेवायला नसेल तर चालेल पण मोबाईलला नेटवर्क हवंच नाहीतर घशाखाली घास उतरत नाही आजकाल आमच्या की झोप येत नाही. इतकी चलबिचल अशी अवस्था झालीय आपली. खरंच सोशल मिडियाच्या या जमान्यात फेसबुक, व्हाटसअप, इन्सटाग्राम या सोशल ॲप्सनी शहरी भागातील लोंकाना नव्हे तर ग्रामीण भागातील लोंकानाही आता तितकंच वेड लावलंय. स्टेटस अपडेट, स्टेटस, तुमच्या मनात काय आहे शेअर करा फोटो, व्हिडिओ, लाईव्ह एक नाही अनेक मार्ग उपलब्ध करून देऊन या माध्यमानी लहानमुलांपासून ते मुलमुली तरुणवर्ग, स्त्रिया, मुलं यांना अक्षरशः वेड लावले आहे. ही प्रसार माध्यमे हाताळताना या लोंकाना काळवेळ याचंही भानही राहत नाही. तासनतास यात आजची तरुणपिढी अडकून पडत आहे. एकिकडे ही माध्यमं प्रसारमाध्यमं म्हणून उपयोगी पडत आहेत तर दुसरीकडे अतीवापरामुळे याचे दुष्परिणामही आपणास भोगावे लागत आहेत. कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टीचा अतिरेक व त्यातून टोकाची भूमिका वाईटच.
एखाद्याला त्याच्या पर्सनल गोष्टीवरून ट्रोल करणं. त्याचं खाजगी जीवन चव्हाट्यावर मांडून उगाचच काहीही माहीत नसताना विषय चघळत बसणं. एखाद्याच्या हातातून चूक घडलीही असेल मात्र ती का घडली ? का नाही ? हे जाणून न घेता उगाचच ती गोष्ट व्हायरल करणं. या गोष्टी खरंच सामाजिक जाणिवा भान जपणाऱ्या आहेत का ? याचा विचार आपणच करायला हवा. आहे वेळ म्हणून चला लिहू काहीतरी मनातलं असं म्हणून जे मनात येईल ते सरळ सरळ लिहून टाकावं इतकं सोपं नाहीये हे जीवन.
आपण आपल्या खाजगी जीवनातले उठल्यापासून झोपण्यापर्यंतचे बारीक सारीक अपडेटस आपल्या मित्रमैत्रणींना देत असतो. आणि मग ते कोणी पाह्यले कोणी नाही, किती लाईक आले हे पाहण्यात सतत मग्न राहतो. रात्री अपरात्री झोपेपर्यंत आपण सतत बेचैन असतो. मग अपुरी झोप. उगाचच स्पर्धेचा ताण, वैयक्तीक हेवेदावे, विनाकारण आरोप- प्रत्यारोप या गोष्टीमधे मन गुरफटून जातं. यात आपलं ध्येय... वाटचाल याकडे दुर्लक्ष्य होतं मग चिडचिड, घरातला ताण वाढतो. उशिरा झोपणं, उशिरा उठणं यामुळे सकाळी अर्धवट झोपेमुळे अळसावलेलं अंग अपुऱ्या आरामामुळे आजारी असल्यासारखं वाटतं. दिवसभर मग उगाचच कंटाळवाणं वाटणं कामात लक्ष न लागणं. उगाचच मग मोबाईल स्क्राॅल करत सतत चाळत राहणं. ही सवय एक चाळाच होऊन बसते. यामुळे आपल्या वैयक्तीक कामावर परिणाम होतो.
खरंतर या सर्व गोष्टीचं, वेळाचं नियोजन केलं तर आपण या माध्यमांचा चांगला व योग्य कामासाठी आपले विचार व कार्य यांचा योग्य प्रसार करण्यासाठी उत्तमरितीने करू शकतो. मात्र किती वैयक्तीक राहयचं व किती सोशल हे आपण आपले ठरवयाची वेळ आलीये. कारण आपल्या वैयक्तीक माहितीच्या आधारे आपल्या कुंटूंबातील व्यक्तींना वा आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण मोठे सतत मोबाईल व काम यात बिझी राहतो. आपण मोठी मंडळी मोबाईलमधे गर्क राह्यलो की आपल्या मुलांनाही आयती संधी मिळते तेही मग याचा फायदा उठवून आई-बाबा, काका, मामा कुणाचं लक्ष नाहीये चला म्हणत तासनतास आयपॅड वर गेम, टि.व्ही वर कार्टून पाहत राहतात. यु ट्यूब वर व्हिडिओ पाहतात... मी माझ्या मुलांना सहज एक प्रश्न केला की तुम्ही नक्की काय पाहता ? काय शिकता ? यातून काही जनरल नाॅलेज ? माझी मुलगी म्हणाली, " अगं आई जस्ट टाईमपास असतं हे. " पाह्यचं अन् सोडून द्यायचं. अगं पण वेळ किती जातो यामधे. परिक्षेत उपयोगी पडत नाही. ध्येय ठरवत नाही. ना कसली मदत ना परिक्षेत नापास झाली तर हे कामाला येतं का ? याचं उत्तर नाही. ही प्रसारमाध्यमं चॅनलस युट्युब सारखी खरंतर खूप छान मार्गदर्शकही आहेत यावर अनेक शैक्षणिक व लहानमुलांसाठी उपलब्ध माहितीपर व्हिडीओ आहेत पण हे पाहण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. या तुलनेत गेम व कार्टून व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण जास्त. तसेच हे व्हिडिओ व गेम खेळताना हिंसक पार्श्वभूमी असलेले गेम्स, तसेच अश्शिल व्हिडिओस ही अधूनमधून डोकावतात असतात. मुलांची लक्ष वेधून घेणारी नजर हे लगेच टिपते. ज्या वयात चांगले बालसंस्कार व मुल्ये यांची ओळख व्हावी असे वाटणारा आपला पालकांचा वर्ग बदलती संस्कृती, बदलता जमाना याच्या नावाखाली का संवेदनाहीन बनत चाललाय समजत नाही. मुलांना वाचनाची गोडी लावून. त्यांना विविध मैदानी खेळ घरगुती कामं, विविध छंद, चित्रकला, नृत्य, संगीत यात का रमवत नाही हेच कळत नाही. नको ती कटकट म्हणून बालकांच्या काय तरुण मुलांच्या हातात मोबाईल वा आयपॅड दयायचे अन् आपण आपले काम करत राहयचे. ही पळवाट खरंच आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी खूप धोकादायक होऊ शकते.
जर वेळीच उपाय न करता यावर नियंत्रण आणले नाहीतर. आजच्या पिढीचं भवितव्य हे डिजीटल तंत्रज्ञानावर अवंलबून असलं तरी एक माणूस म्हणून घडवताना समाजाचा एक जबाबदार नागरिक घडवताना संयम, प्रेम, नैतिकता, चांगलं वाईट याची ओळख करून देणे ही पालकांची नव्हे तर समाजाचा एक घटक म्हणून आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की आपण सजगपणे ही माध्यमं हाताळायला हवी व याचा आनंद घ्यायला हवा नाहीतर अतीउत्साह निरूत्साही जीवनाचं कारण होऊन होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही.

लेखिका - तनुजा ढेरे

No comments:
Post a Comment