Monday, 31 August 2020

पिंपळाखालच्या आठवणी




हेंमत ऋतूतलं पहाटेचं कोवळं धुकं अंधारातून वाट काढत जेव्हा सगळीकडं पसरतं तेव्हा धुईचे पांढरशुभ्र लोट अंगावर झेलत तीहिरवीगर्द झाडी पाने - फुले आपल्यासारखीच थंडीने कुडकुडत अंग आखडून घेतायेत असं त्यांच्याकडे पाहताना वाटतंउन्हाचीकोवळी सर जेव्हा खिडकीतून घरात येते तेव्हा त्या उन्हाच्या कोवळ्या कवडशाची जादू पापण्यावर होते आहे अन् डोळ्यांना ग्लानीयायला लागलीय असं वाटतंअन् मन पापण्या मिटून घेताना अलगद आजोळचं अंगण गाठते अन् आजोळच्या अंगणातल्यापिंपळाखाली खेळतानाच्या गमतीजमती आपोआपच डोळ्यांसमोर तरळू लागतातआजोळच्या अंगणातला पिंपळ पहाटेला गूढनिळ्या निळाईत जेव्हा सळसळायचा तेव्हा जणू समुद्रच्या लाटाच उसळल्यात असं वाटत राहयचंअन् त्याच्या आवाजात मन रममाणहोतानाअंगणातल्या पिंपळाखाली तासन् तास बसून राहव असं वाटायचं.  पिंपळाच्या हिरवट रंगाच्या बदामी आकाराच्या पानोळीतून वाट काढत उन्हाची तिरपी किरणं अंगणात नक्षीदार कशिदा विणतायेतनाहीतर पाठशिवणीचा खेळ खेळता खेळतालखलखत हळूच लपून बसतायेत असं वाटायचं. हा पाठशिवणीचा लपंडाव पाहता पाहता मन तासनतास त्यात रमून जायचंसकाळाची ही कोवळी उन्हं उंबरठा ओलांडून घरात शिरायला लागली की  बोचरी थंडी अंगाला शिवशिवताना ही कोवळीउन्हं हातापायाला गुदगुल्या करतायेत असं वाटायचं.

सकाळी सकाळी चुलीवर आदण आलेल्या पाण्यानं आजीनं अंगाला उटणं लावून केसाला शिकाकाई रिठानिरमा घालून तेलापाण्यानं न्हाऊ माखू घातलं की गरमागरम चहा पिऊन या पिंपळाच्या झाडाखाली उन्हाला तासन् तास बसून राहवसं वाटायचंझाडावरची चिमणी पाखरं चिवचिवणारीकावळे कावकाव  करताना ऐकत राहवसं वाटायचंसकाळी सकाळी डोक्यावरमोरपीसाची टोपी घालूनहातातल्या टाळचिपळ्या वाजवत आलेला वासुदेववासुदेव आला हो वासुदेव आला असं ऐकताना मनआनंदानं टाळ्या वाजवायचंअंगणात आलेला वासुदेव असो वा दारात जोगवा मागायला आलेली जोगीन वा परटीन कधीही रिकाम्याहाताने परत गेले नाहीतदादाआजोंबाच्या मित्राची तर रोज सकाळी रेडिओवरल्या बातम्या ऐकायला सकाळी सकाळीच फौजजमायचीमग गरमागरम चहा बरोबर देशोविदेशातील बातम्यापासून ते खालच्या आळीतल्या सरंपचा पासून ते दिल्लीतल्यापंतप्रधानाच्या बातम्यांचा फड रंगायचाती थोरमंडळी निघून गेली की मग दादा तिथंच पिंपळाखाली बसून सकाळची न्याहरीकरायचेसकाळची कामं उरकली की गोठ्यातली गाय सोडून शेताकडची वाट धरायचे


आम्ही मुलं पिंपळाच्या कोवळ्या पानाच्या गोल वळकट्या हातावर करून पिपाण्या बनवून पी पी वाजवत दिवसभर खेळायचोपिपळाखालचं नरसूबाचं मंदिर अन् त्यातलं ते पाच देव दगडाचं उभं त्याला रोज अंघूळ घालून शेंदूर उदबत्ती धूप फुलं वाहताना मनप्रसन्न व्हायचंयाच पिपळाखाली आम्ही पोरं काचकवड्याचिचुकंविट्टूदांडूगजगंपकडापकडी असे कितीतरी खेळ खेळायचोपिपळाच्या एका बाजूला गाईगुराचा गोठा अन् एका बाजूला जुका आत्याचा कोंबडयाचा खुराडा यात लालपिवळीगुलाबी रंगानीरंगवलेली कोंबडीची पिल्लं अन् कोंबड्या पकपक करत सगळ्या वाड्यात फिरायच्याआम्ही पोरं त्या कोंबड्या पकडायला धावायचोपण एक ही हातात घावायची नाहीरात्री आजी या पिपळाखाली एका कोपऱ्यात मांडलेल्या चुलीवर चहाचं आदण ठेवायचीतोचुलीवरचा चहाती तिखटामिठाची कोंडबळी पाटावरहातावर वळलेली अजूनही जीभेवर चव रेंगाळतेयया पिंपळाखालीच चवाळंअंथरून आम्ही निजायचोया थंडीच्या दिवसात पिंपळाच्या झाडाखाली झोपताना खूप मजा यायचीआकाशातल्या टिपूर चांदण्यापानाआडून खुणवत राह्यच्यापिंपळाच्या हिरव्या फांद्याआडून दिसणारा चंद्र कधी वाड्याबाहेरच्या कडूनिंबाच्या झाडाआड जाऊनलपायचा समजायचं देखील नाहीमग मन खुदूखुदू हसू लागायचंचांदोमामाच्या रथात बसून चांदोबाच्या हातात हात घालून मनदुडुदुडु धावत या सुगीच्या दिवसात कणसांनी भरलेली हिरवी शिवारं अख्खं गाव फिरून यायचंआजी आजोबाच्यामैत्रणींच्यापरिकथेतील दुनीयेत फेरफटका मारायचं अन् दमूनभागून पिंपळाच्या कुशीत हिरवट स्वप्नात दमून निजायचंबाजूला असलेलं चंद्रीगायीचं वासरू अधूनमधून हंबरत राहयचं आईच्या कुशीत निजायचंपहाटेला आईचं अंग चाटायचं तेव्हा चंद्री गाईला पान्हा फुटलाकी दोर ओढायचं गळ्यातल्या घुंगरमाळाचा खणखण आवाज करत चंद्री गाईला बिलगायचं.


मला खास करून आठवतंय ते दिवाळीच्या वा उन्हाळाच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर लग्नसराईचं दिवस कुणाचं तरीवाड्यातील पोरा-पोरीच लगीन असायचंच मग आठवडा दोन आठवडा वाडा माणसांनी गजबजून जायचावाजंत्रीपरीटगावकरीपाटीलसरपंचापासून गावातली समंदी कामाला यायचीगावातल्या कासराला चुडा भरायचं अन् बांगड्या भरायचं आवतानअसायचंगावच्या आचराल्याला जेवणाखावणाचं कंत्राट दयायचंमग मंडपसजावटबोहल्या पासून बाशिंग बांधण्यापर्यंतची कामंदिली जायचीघरावर वाडयाच्या दरवाज्यावर भोई शिपाईची चित्रं रंगवली जायचीमला आठवतंय वाड्यातल्या पिंटूमामाचं लगीनलगनाला शकुमावशीइनू आत्याम्हादूकाका लांबची मंडळी आली होती नवरी बाजूच्याच गावची होतीआमच्या घराला लागूनचपिंटूमामाचं घर होतंघराला रंगरंगोटी केली होतीपिंपळाखालीच मांडव घातला होताहळदीच्या पाटापासूननवरानवरीला अंघोळघालणेनवरीची पाठवणी करणेवाड्याबाहेरचा आतला मंडप सजवटीची सगळी कामं अन् मग नविन जोडप्यांचा संसारथाटण्यापासून त्यांची मुलं बाळं अन् म्हातारपण पिढी दोन पिढीचा प्रवास याच तर पिंपळानं पाह्यला होता अन् अंगाखांद्यावरखेळवला देखील होताआता तो पिंपळ नाही मात्र त्याच्या सुखदस्मृती मनाच्या वहित अगदी भरजरी सोन्यांनी विणलेल्या जीर्णझालेल्या पिंपळपानासारख्या मनात अजूनही जपून ठेवलेल्या आहेतच की माझ्यासारख्या तुमच्याबद्दल मनात हो की नाही ? मात्रहाच पिंपळ जेव्हा शिशिरात निष्पर्ण व्हायचा तेव्हा त्याचं धुईत भिजलेलं थंडीत कुडकुडणारं हिरवं अंगचंदेरी उन्हात आपल्याकडेचोरून पाहणारं आठवलं की मन मात्र परत परत तो आठवणींचा सुवास मनात भरून पिंपळाच्या अंगाखांद्यावर खेळत राहयचं.


तनुजा ढेरे

No comments: