जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं त्याच्यातील असुरक्षितेची भावना म्हणण्यापेक्षा स्वतःविषयीची काळजी वाढत जाते. शेवटी काळजी म्हणजेच असुरक्षितता नाही का ? स्वःता विषयीच्या जाणीवा प्रगल्भ व्हायला लागतात. आणि या जाणिवा प्रगल्भहोत असताना आयुष्य आपल्या मुठीतून निसटतं आहे असं वाटू लागतं. आपल्याला आठवण व्हायला लागते जगलेल्या न जगलेल्याअनुभवलेल्या क्षणांची. हिशोब करता करता मग अगदी बोटावर मोजण्या इतके क्षण जगलेले. अरेच्या हे राहिलंच की जगायचं. अरेच्या ! हे करायचं राहुन गेलं हे उद्गार आपोआपच ओठावर येतात आणि मग चालू होतो प्रवास पुन्हा नव्याने मागे वळून पाहताना नजगलेल्या, अपुऱ्या राहिलेल्या, ईच्छा आकांक्षा पुर्ण करण्याचा अट्टाहास. काहीजण अगदी सहजतेने असू देत जाऊ दे म्हणत सोडूनदेतात विषय. तर काही जीवना विषयी रसिक असलेले लोक तितक्याच उत्कटतेने पुन्हा जगण्याचा प्रयत्न करू पाहतात. खरंतरआयुष्यात माणूस कधी यशस्वी होतो तर कधी कधी नैराश्याच्या गर्तत अडकतो. केलेले संकल्प पूर्ण करतो नाहीतर शेवट पर्यतकामाचा गाडा हाकत राहतो. नाहीतर एकतर आयुष्य भर समाधान मानत राहतो. नाहीतर कुरकुरत राहतो.
जो तो आपण अजुनही तरूणच आहोत या अविर्भावात जगण्याचा अट्टाहास करतो. अरेच्या आपण ही गोष्ट पूर्वीच करायला हवीहोती. हे राहयलच की जगायचं असं बोलताना. आपण परत नव्याने सुरवात करू राहिलेले क्षण जगू असे म्हणत मनाशी खूणगाठबांधत राहतो. समाज, संसार, नोकरी, जबाबदारी, कर्तव्य पार पाडता पाडता स्वतःचं जगणं आपण विसरून जातो. आपल्यालाकाय आवडतं काय नाही हा विचार मागेच राहतो. मनाला मुरड घालुन जगत राहतो. खरंतर आपण दिवसातील कितीतरी वेळ अगदीअसाच वाया घालवतो, ते आपल्या लक्ष्यात ही येत नाही. खरंतर ते क्षण आपलेच असतात पण आपण सहज कानाडोळा करतो यागोष्टीकडे आणि जाऊ दे आता कंटाळा आलाय ही निरूत्साही भूमिका त्यातून बळावते.
मग साक्षात्कार झाल्यासारखं आयुष्याचा एका टप्प्यावर आपले आयुष्य आपल्या मुठीतून निसटतं आहे असं वाटत असताना. आपल्याला आठवण व्हायला लागते जगलेल्या न जगलेल्या अनुभवलेल्या क्षणांची. हिशोब करता करता मग अगदी बोटावरमोजण्याइतके क्षण जगलेले. अरेच्या हे राहिलंच की जगायचं. अरेच्या हे करायचं राहुन गेलं हे उद्गार आपोआपच ओठावर येतातआणि मग चालू होतो प्रवास पुन्हा नव्याने मागे वळून पाहताना न जगलेल्या अपुऱ्या राहिलेल्या ईच्छा आकांक्षा पुर्ण करण्याचाअट्टाहास. काहीजण अगदी सहजतेने असू देत जावू देत म्हणत सोडून देतात विषय तर काही लोक जीवना विषयी रसिक असलेले तितक्याच उत्कटतेने पुन्हा नव्या उमेदीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू पाहता यशस्वीही होतात. तर काही जण मध्यंतरावर होनाही हो नाही करत समाधान मानून तिथेच व्यस्त राहतात आत्ममग्न.

"नाही रे तुला चाळीसावं लागलं तुझी जन्मतारीख काय मग नाही हो करत एकोणचाळीस पूर्ण चाळीशीव्हायचीय यावर हिशोब संपतो. मग हळुच आपला चेहऱ्यावरून, केसावरून हात फिरवतो. तोपर्यंत आपण आरश्यासमोर येऊन उभेराहतो. एखादा पांढरा केस काळ्या केसातून डोकावणारा अस्वस्थ करतो. आपण या हेअरस्टाईल च्या नावाखाली आपण केसांनाकिती वर्ष झाले तेलच लावायचं विसरलोय. आता रोज केसांना खोबरेल तेल लावायला हवं. आपण इतक्या दिवस नीट चेहऱ्याचीकाळजी नाही घेतली. डोळ्याखाली थोडसं काळं झालंय. चेहऱ्यावरील एखादीच सुरकुती पण खूपच अस्वस्थ करते. पोटाला पडलेलीवळकटी पाहुन अरे नाही आता रोज चालायला हवं. नववा महिना लागलाय वाटतं इतकं पोट डेरेदार वाढलंय असं सतत वाटतराहतं.एक ना दोन त्रुटी आपल्याला सगळं आठवायला लागतं. आणि आपल्या मनात आपल्या दिसण्या बाबतची असुरक्षितता आणिजागरूकता एकाच वेळी निर्माण होते.किती ही चांगले महागडे कपडे चपला गाॅगल लावला तरी तुमचं वय अथवा तुमचं असणं आणिदिसणं लपवू शकत नाहीना. ते थोडंफार पाच दहा टक्के इकडे तिकडे त्यानं फरक पडू शकतो. पण मूळात तुमचं व्यक्तीमत्त्वमहत्वाचं.
आणि अचानकच आपण स्वतःबद्दल पझेसिव व्हायला सुरवात व्हायला लागतो. अरे ! आपण किती बारीक होतो तेंव्हा नी आतापाहा. सगळी सुख पायाशी लोळण घालतायेत आणि आपण वरचेवर आळशी होत चाललोय. एक वेळ अशी होती की आपण कितीबारीक होतो. एकदम सडसडीत बांधा. लांबसडक काळे कुळकुळीत केस .पाणीदार डोळे आणि आता आपणच आपल्याकडेकामाच्या नादात पाहयचं विसरलो आणि अशी अवस्था करून घेतली खरंतर पण नाही आता महिन्यातून एकदा फेशियल करणारच, रोज चालायला जाणारच. वेळेवर जेवणार वेळेवर झोपणार आणि स्वतःची काळजी घेणार असं म्हणत लवकर उठायचं ठरवूनअलाराम लावून झोपून जातो. दुसऱ्या दिवशी अलाराम वाजून ही आपण उठत नाही. तसेच लोळत राहतो. अरेच्या अलाराम वाजलाहोय आपल्याला कळले ही नाही. अरेच्या आळस झटकत मग उदयापासून उठुया असं म्हणतो. पण हा उदया कधी उगवतच नाही. उदया उदया म्हणता किती तरी दिवस असेच जातात. एखादया दिवशी फेरफटका मारून आलं की मनाचं तोकडं समाधान करत परतमन आहे तसच जगू लागतं. कारण सवय आणि अंगवळणी पडलेलं वळण मोडत नाही लवकर. पण आजपासून सुरवात केली तरनक्कीच आपण उदयाचे दिवस आनंदात जगू शकतो. सदाफुली सारखं. सकारात्मक दृष्टीकोनासह.
सौ. तनुजा ढेरे
No comments:
Post a Comment