Sunday, 30 August 2020


 

'वेदना जेंव्हा संवेदना होते तेंव्हा साहित्य निर्मिती होते.'
             जेष्ठ कवी अशोक बागवे.
उस्मानाबाद: साहित्य हे लेखकाचे अपत्य आहे. लेखन करताना संवेदना जागृत असाव्या लागतात. त्यासाठी भोवतालच्या समाज वास्तवाकडे  संवेदनशीलतेने पहावे लागते. प्रसंग पाहताना मन अस्वस्थ झाले पाहिजे तरच वेदनेची कविता होते. असे प्रतिपादन प्रा. ज्येष्ठ कवी अशोक बागवे ठाणे यांनी केले. रविवार दिनांक २९.१२.२०१९ रोजी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात सौ तनुजा ढेरे लिखित 'मंतरलेली उन्हे' या ललितलेखसंग्रहाचा व 'ऋतुमितवा' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा अशोक बागवे बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमात प्रम महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड विश्वस्त मा. राजन लाखे यावेळी म्हणाले की, 'वास्तव हे सुंदर असेलच असं नाही , वास्तव हे कधी कधी विदारक असते पण वास्तवतेत सौंदर्य निर्माण करण्याचे सामर्थ्य  शब्दात असते. वास्तवतेला सौंदर्य प्राप्त करून देणे तसेंच सुंदरतेला अधिक सौंदर्य बहाल करण्याची ताकत लेखिकेच्या शब्दात असल्याने तनुजा ढेरे हिने मंतरलेली उन्हे या ललित लेखांमधून सिध्द केले आहे. तनुजा ढेरे यांच्या साहित्यातून निसर्ग आणि मानवी मन यांचा संबंध आलेला आहे. बालपणी अनुभवलेला निसर्ग शब्दातून त्यांनी अप्रतीमतेने  व्यक्त केला आहे.' असे राजन लाखे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर सुंदर अशी  सुरुवात मा. नीतीन (भाऊ) तावडे स्वगताध्यक्ष ९३ वे अ. भा. सा. संमेलन उस्मानाबाद यांनी केली. यावेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की तनुजा ढेरे या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत यांचा आनंद आहे. यांच्या, प्रगल्भ जाणिवेतून निर्माण झालेले साहित्य वाचनीय आहे. लेखिका तनुजा ढेरे यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपल्या पुस्तक लेखनाची प्रेरणा सांगताना लेखिका कवयित्री तनुजा ढेरे म्हणाल्या की, 'निसर्गातील झाडे, पाने,फुले, पशू पक्षी  अवतीभवतीचा भवताल त्यांना खुणावत असतो. तोच अनुभव मी शब्दबद्ध करते. निसर्ग हा माझ्या लेखनाचा पहिला प्रेरणास्तोत्र आहे. आपला गाव, आपली माणसं, इथला परिसर, इथला निसर्ग हेच माझ्या या लेखनाचे विषय असून या पुस्तकातील शब्दांना इथल्या मातीचा सुगंध आहे. ' यावेळी डिंपल प्रकाशन वसईचे सन्माननीय अशोक मुळे, मंगळवेढा सप्तश्री प्रकाशनचे सिध्देश्वर  घुले,  नगरसेवक युवराज नळे, प्रा. शिवाजी गायकवाड, ९३ वे अ.भा.सा.संमेलन रविंद्र केसकर कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष माधव इंगळे तसेच जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे, अक्षरवेलमंचच्या अध्यक्षा कमलताई नलावडे,  रानफूल मंचाचे संस्थापक हरिश्चंद्र खेंदाड व इतर मान्यवर सदस्य तसेच गुलमोहर मंचाच्या मीना महामुनी, मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेचे सन्माननिय पदाधिकारी उपस्थित होते. मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेची सदस्य या नात्यानी त्यांचा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व  मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. उपस्थित मान्यवर साहित्यिकांचा शाल,  पुष्पगुच्छ पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बहुसंख्य साहित्य रसिक उपस्थित होते. क्रार्यक्रमाच्या वेळी आभार सोमनाथ पेठकर यांनी मानले. तर अतीशय सुंदर असे सूत्रंचालन करून प्रा. अरविंद हंगरगेकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

No comments: