सांज
सांजउन्हे रानावर सोनसळी... पसरली
रान पाखरं अधीर घरट्यात... परतली
मूक झाडे बांधावर हळवी कातर झाली
छटा गुलाबी केशरी दाटू डोळ्यांत लागली
नदी डोह शांत तळी काठावर पहुडली
स्वप्नं कवेत घेऊनी फुलं पानं ही निजली
मऊ मऊ कुशीमध्ये पिल्लं इवली शिरली
वारा मंद अंगी गाऊ पानं अंगाई लागली
झाडं मागे धावताना चंद्र सोबतीला आला
चांदण्या मोजताना हा जीव खेळात रमला
सांजवेळ सूर्य मावळताना निळं आभाळ गुलाबी रंगलेलं... सूर्याचा गोळा गडद गडद होत जाताना नाहीसा होणारा. त्याची केशरी छटाअंतरंगात खोलवर उतरत जाणारी. रान मुकी झाडं बांधावर पाहून मन हळवं झालेलं. आकाशात संथपणे उडणारा पाखरांचा थवा पाहूनमन आकाशात झेपावू लागलं प्रवासात आपल्या बरोबर धावती झाडे मागे पळणारी पाहून खूप मजा वाटू लागली. एकीकडे अंधार गडदहोत असताना कातर सांज... संधीप्रकाशाची छटा क्षणभरच मनाला सुखाचा चटका लावून गेली. आणि मग चंद्र पाठी पाठी धावतअसताना एक एक चांदणी चमचमत उगवताना, आभाळ चांदण्यांनी भरून आलं. अन् वेडं मन सगळा प्रवासाचा क्षीण विसरून चांदण्या
मोजण्यात मग्न होतं अजूनही...

No comments:
Post a Comment