Saturday, 29 August 2020

मनातली माणसं


प्रिय जमू


औपचारिकता नाही ठेवणार आता दोन तीन पत्र पाठवून झाली तुलामनातलं सांगायला एक जीवाभावाची वाट मिळाली बघअगंकालच ते आपल्या गावचे नरसू पाटील घरी आले होतेभला माणूसगावचं दहा एक वर्ष सरपंच पद निभावलं ना पाटलानंकसलाहीगर्व नाही ना भुशारकीअंगणवाडीबालवाडीमहिलासाठी रात्रशाळाआणि विशेष म्हणजे हागणदारी मुक्त गाव.घर तेथेशौचालयअसावं यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खरच मानावेच लागतीलतर ते सांगत होते कीआपले वरच्या आळीतले विष्णूकाका गेले गंचार मुली तीन मुलं सात अपत्ये आणि कमलताई त्यांच्या पत्नी असा परिवारमुलं शिकलीमुली शिकल्यानोकरीलालागली लग्नं झालीचार दिशेला चार स्थिरस्थावर झालीगावच्या वाड्यातला कलकलाट शांत झाला.


किती मायाळु आणि प्रेमळ होते विष्णू काकाभरभक्कम उंचापुरा गोरागोमटी देहयष्टीपांढरा अंगरखाधोतरडोक्यावर गुलाबीरेशमी फेटातशाच पिळदार मिशा पायात कोल्हापूरी चप्पल असायची नेहमीलयच रूबाब होता नाही का गं ? किती गोड बोलायचेदारावरून जाताना घटकाभर आप्पांशी बोलल्याशिवाय पुढे जायचे नाहीतपान काढून सुपारी कातरुनकात घालूनचुना पानालानखाने खवून लावून नखभर पुदिन्याची कांडी टाकायचे पानातकधी कधी हुक्की आली तर मला पण आवडायचंविष्णू काकांच्याहातचा पानाचा विडा खायलापान खालल्यावर इवलशे ओठ जीभ रंगले की विष्णू काका म्हणायचे, " लय प्रेम करणारा नवरामिळणार बघ तुला." आणि मी जीभ बाहेर काढत उगाचच हसायचे ह्याॅ ह्याॅ काहीही विष्णू काका तुमचं ? विष्णू काका म्हणायचे, "बरं बाईकागदावर लिहुन देऊ काआज खरच गं सुमा खूप प्रेम करते माझ्यावरपण विष्णू काका नाही राहिले गंदेव चांगल्यामाणसांना का लवकर घेऊन जातो गं वरती.


जमू , तुला एक सांगू का या माणसाचा स्वभाव काही मला पटला नाही बघकिती विचित्र गंसगळ्या गावाशी तो प्रेमाने बोलायचाअगदी मायेने विचारपूस करायचा पण कमलताईशी त्यांच्या पत्नीशी कधी तो नीट नाही बोलला कधी विचारपूस केली मायेनंमुलंही त्यामुळे नेहमी आपल्या वडिलांच्या फटकळ वागण्यामुळे लांबच राहिलीवडिलांची माया त्यांना मिळलीच नाहीघरात नीटबोलायचं नाहीपण गावच्या सगळ्या खबरा मात्र चघळत बसायची यांची सवय यांना नंतर महाग पडलीगावातली लोकही लांबचराहू लागली यांच्यापासूनयाचं त्याला अन् त्याचं याला सांगायची यांची सवयमुलांनी मोठं झाल्यावर बापाला आधार दयायचासोडून वाळीतच टाकलंईस्टेटीच्या वाटण्या झाल्या अन् चार भावांनी गावच्या घराकडं अन् आईबापाकडं कायमची पाठ फिरवलीअधीमधी विष्णू काका जायचे नातवंडासाठी पण अलीकडे ते ही बंद झाले होतेमुलांनी कमलताई विष्णू काकांची वाटणी केलीहोतीएक महिना कमलताईला  एक महिना विष्णू काका असं एक एक मुलगा सांभाळणार पण विष्णू काकांना ते मान्य नव्हतंनंतर नंतर चार पाचशे रूपडयाची मनी ऑर्डर येऊ लागली थोरल्या लेकाकडनंपण महागाईच्या काळात कसं भागणार तसं ज्वारीशेंगदाणं भाजीपाला घरचाच पण एवढ्यानं काय होतंयनशिबाचे भोग म्हणायचेआणखी काय ? नरसू पाटील सांगत होते, "विष्णूकाकापरवा थोरल्या मुलाकडं गेले होतेसंध्याकाळची सातची गावाकडंची बस पकडण्यासाठी बसस्टॅन्डवर गेलेस्टॅन्डमधेच बसपकडण्याच्या घाईत विरूध्द दिशेने येणारी बसविष्णू काकांची नजर मोतीबिंदूने कमजोर झाल्या कारणाने त्यांना समोरून येणारीदिसलीच नाही आणि बसने विष्णू काकांना उडवले." हे ऐकता क्षणी जीवाचा थरकाप उडाला बघकिती भयानक आहे हे सगळंमाणूस क्षणात आता आहे तर आता नाहीपुढच्या क्षणी काय होईल भरोसा नाही


माफ कर पण राहवलं नाही गंविष्णू काका गेल्याचं कळलं आणि जीव तळमळला बघमला जमलं नाही जायला शेवटचं पाहयलापण गावी आल्यावर नक्की कमलताईंना भेटेन आवर्जूननिरोप सांग माझामाझं एवढं धाडस तर होणार नाही पण ताईवरची मायाशांत बसूही देणार नाहीखरंच जमू ही जुनी माणसं याचं जगणं एक अजबच जीवनाचं रसायन शिकवून गेली गं कळतनकळतआताही माणसं एक एक काळाच्या पडद्याआड जातायेतपण यांच्या स्मृती कधीही नष्ट होणार नाहीतकारण यांच्या बोलण्यातकडवटपणा असायचा कधी कधी पण तो आपल्या हितासाठीच नाहीतर आजच्या काळातली नाती जीभेवर साखर पण आत मात्रकडवडपणा भरलेला असतो यांच्या असो खूपच लांबलं गं पत्रपण मनात राहवलं नाही म्हणून लिहिलं


                       तुझीच मैत्रीण,

                       बाबी.

No comments: