Saturday, 29 August 2020

माझी माय सरसोती


'महीम्हणजे पृथ्वी  'ईलाम्हणजे सरस्वस्ती आणि या पृथ्वीवरली सरस्वती म्हणजचे महिलाखरं तर आपली आई ही सरस्वतीचं रूपच आहेकवयित्रि बहिणाबाईनीं सुध्दा एका कवितेत किती सुंदर लिहिलंय...


माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्यामनी
किती गुपीतं पेरली !’

आई तूच सरसोतीमला पोटातच असताना तू बोलीभाषेचे संस्कार केलेसआणि जीवनाची गुपीतं पेरलीसकिती अर्थगर्भ लिहिलंयआणि हे खरंयआपली आई आपण गर्भात असतानाच आपल्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी प्रयत्न करतेचांगल्या विचारांचीआचारांची रूजवात करतेआपल्या आजीच्या मांडीवर खेळतगोष्टी ऐकत आपण लहानांचे मोठे होतोआपल्यावर अनेक गोष्टीचेंसंस्कार हे मुळात घरातच होतातचांगले वाईट म्हणजे काय ? त्यागसमर्पणप्रेमसुखदुःखस्वैराचारस्वातंत्र्यमानसन्मानयश-अपयश यांच्या परिभाषा आणि हे जगणं कसं  जगावंसोसावं संयम ठेवूनएक मुलगी म्हणून मोठी होताना बाईनं आपलं शीलबाईपण कसं जपावंहे सगळ आपण आईआजीकडूनच शिकतो नाही का ?

खरंतर आई आनंदी तर घर आनंदी राहते,
घर आनंदी तर समाज आनंदी,
समाज आनंदी राहिला तर राज्य आनंदी 
पर्यायाने सारा देश आनंदी होईल.’
                                    

डाॅकलाम यांनी किती छान लिहून ठेवलंयसाऱ्या विश्वाचं मूळ सुखाचं हे आईच्या डोळ्यांत आहेस्त्रीच्या मनात आहेपण आपणहेच विसरतोपण तरीही स्त्री रडत नाही तर ती लढतेच आहेअसंच माझी काकूआजी तिने खूप कष्ट केलंसंसारासाठी झटलीपोटच्या गोळ्यांसाठी दुःख पोटात घालूनहसू ओठावर ठेवूनसोशिकपणे आयुष्य जगली आणि आयुष्य कसं जगावं हेकाकूआजीच्या जगण्यातूनच माझ्यावर नकळतच बिंबलेकाकूआजी कष्ट करत करत हसत हसत देवाघरी गेलीजाताना जीवनाचंमर्म सांगून गेली.

पार्वती आजीच्या हातचं चविष्ठ रूचकर जेवणसात्विक जेवन बनवावं असं आजी म्हणायची," जेवण बनवताना आपली वृत्ती नेहमीनिर्मळ ठेवावीआनंदी ठेवावी कारण तोच आनंद तोच भाव जेवणात उतरत असतो." मामीचामायाळूदयाळूकनवाळू स्वभावमाणसं कशी जोडावी नाती कशी जपावी शिकवून गेलाअशा कितीतरी स्त्रीअभिव्यक्ती आपल्यावर आपले ठसे उमटवत असतातआईचा सोशिकपणासंसारातील भूमिकानात्यांचे पाश कसे सांभाळावे हे शिकत असतानाचशालेय जीवनात आपल्याला तिसरीचौथीच्या पुस्तकातच किंबहुना आजीच्याआजोबांच्या मुखातून ऐकलेल्या जिजाऊच्या गोष्टी प्रेरणा देतातबालशिवाजीघडवतानाची जिजाऊ आई आपले आदर्श बनतेस्त्री शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची भूमिकामनात खोल रुजतेइंदिरा संतकवयित्रि बहिणाबाई चौधरीसंत मुक्ताबाईच्या ओव्या जीवनाचं गणित सहज उलगडून दाखवतानाशालेय जीवनातील कवितातून या स्त्रीअभिव्यक्ती आपल्या जीवनाच्या जडणघडणात नकळत सहभागी असतातच.

आपली बहीणजी सतत आपल्या पाठीशी उभी असतेचुकलं तर कान पिळणारी आणि चांगलं झालं तर कौतुक करणारीतीचावाटा तर लाखमोलाचा असतो आपल्या यशातशाळेतकाॅलेजात अशा अनेक वर्गशिक्षिका होत्याशाळेत शिंदेबाईंची शिस्तदहावी बारावीत मोरेबाईंचा दरारामहाविदयालयीन शिक्षणात पवार बाईअॅलीना मॅमनी कविता आणि कादंबरी लेखन मनात असंखोल रूजवलं की वाटायचं ऐकतच राहावं ते कादंबरीचं विश्वएम.पी.एस.सीचा अभ्यास करताना कुलकर्णी मॅडमचं वर्तन  अभ्यासयांचा कळत-नकळत झालेला परिणामज्ञानप्रबोधिनीच्या गुरूकुल पध्दतीचे संस्कारया स्त्रीअभिव्यक्ती एकिकडे आणि काॅलेजातअसताना माधुरी दिक्षितचा प्रभाव होतापंतप्रधान इंदिरा गांधी या सतत डोळ्यांसमोर टि.व्हीवर असायच्यातसेच टि.व्हीवर निवेदनकरणाऱ्याबातम्या देणाऱ्या स्त्रिया होत्या नकळत त्यांचे हावभाव  त्यांची शैली मनावर परिणाम करत होतीतर एकिकडे झाशीचीराणीअहिल्याबाई होळकररमाबाई रानडेडाॅआनंदीबाई जोशीयांचा जीवनप्रवास वाचताना नकळत यांचा जीवनावर प्रभावपडत होताआत्ताचं उदाघ्यायचं तर माजी महिला राष्ट्रपतीडाॅ.प्रतिभा पाटील मला आदर्शवत वाटतात एक उच्च पदस्थ अधिकारीम्हणूनतसेच माईमा.सिंधूताई सपकाळ ताईमा.डाॅ.स्मिता कोल्हेमारश्मी करंदीकर मॅममापद्मश्री शितल महाजन... याबरोबरच माझ्या सर्व  मैत्रणीं ज्या कुठल्या ना कुठल्या कलागुणात पारंगत आहेत... त्यांच्या कलागुणांच्या कळनकळत पाॅझिटिव्हवेव्हज आपल्यापर्यंत पोहचत असतात याचाही वाटा आपल्या व्यक्तीमत्व विकासावर होत असतो असे मला वाटते

खरंतर आता आपल्याला या सदयपरिस्थितीत अनेक माध्यमं उपलब्ध आहेत व्यक्त होण्यासाठी पूर्वी असं नव्हतंतसं पाहयला गेलंतर बाई आतली सल सांगत नाहीबाई कधी आपल्या शरीरवरच्या जख्मा उघडून दाखवू शकत नाहीमन उघडून दाखवू शकत नाहीतसं केलं तर आपण ते पाहू शकणार नाहीबाई कधी आपलं दुःख जगासमोर मांडत नाहीपूर्वी बायका पाणवठ्यावर जाऊनएकमेकींजवळ आपलं सुख दुःख बोलतमन मोकळं करतआता हे सोशलमिडिया एक छान व्यासपीठ हक्काचं मिळालंय तर नक्कीच आपण सर्वं मैत्रिणिंनी निखळआनंदी आयुष्य जगताना आपले आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जाणिवपूर्वक हे माध्यम हाताळलंपाहिजेनिरोगी आयुष्य जगलं पाहिजेएक आदर्श आपण ही निर्माण केला पाहिजे ‘नारी ही अबला नाही तर सबला आहे.’


तनुजा ढेरे

No comments: