Wednesday, 26 August 2020

माझं ब्लॉग लेखन

माझा हा ब्लाॅग म्हणजे माझ्या लेखनाचा चढता आलेख आहे. एक साहित्यिक या नात्याने मी सर्व साहित्य प्रकारांना स्पर्शून लेखन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्व रसिक वाचकांना हा माझा हा ब्लाॅग आवडेल ही आशा. खरंतर गेली काही वर्ष मी सातत्याने वर्तमानपत्र, साहित्यिक मासिकातून, दिवाळीअंकातून लेखन केले आहे. ललितलेखन, कथा, कादंबरी लेखन (सदर) लेख, कविता, पुस्तक परिचय, साहित्यिक व माहितीपर अंगाने जाणारे ते लेखन होते. माझी पुस्तकंही प्रकाशित आहेत. परंतु आताच्या या डिजीटल बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन मी नव्या हुरूपाने या ब्लाॅगवर माझं साहित्य प्रकाशित करणार आहे. आपली साथ तर लाखमोलाची आहे कारण लेखन हा प्रकारच असा आहे की तो एक अंगाने जात नाही तर तो दुवा आहे लेखक व वाचक यांच्यामधील. स्वानुभवातून पुढे जाऊन, समुह डोळ्यासमोर ठेवून समकालीन विषयांना समोर ठेवून लेखन करण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न असेल.

तनुजा ढेरे


No comments: