आम्हा मुलांना लहानपणी भातुकलीचा, बाहुलाबाहुलीचा खेळ खेळायचं वेड नव्हतं तर झाडाची विविधरंगी, विविध आकाराची पानं- फुलं गोळा करायची, त्याचे हार गजरे बनवायचे याचं वेड होतं. शाळा सुटल्यावर गावाबाहेरच्या डोंगरावर संध्याकाळी आम्ही तासन्तास भटकायचो, तेथील विविध प्रकारची गवतफुले, गवताचे तुरे गोळा करायचा छंदच जडला होता आम्हाला. आणि मग याछंदातूनच आमच्या घरा समोरच्या अंगणात एक बाग फुलवायची ठरवली. अंगणात तशी आईने लहान लहान कुंड्यात शोभेची झाडं, वेल लावलेले होते. त्याची इवली इवली पानं, फुलं, रंग पाहण्यात मजा यायची. मग आम्ही मुलांनी अंगणाचा एक कोपरा हेरून तीजागा खुरप्याने तण काढून, खणून चांगली भुसभुशीत केली. छोटे छोटे खड्डे करून त्याला आळी केली व त्यात आजुबाजूच्याझाडांच्या डोळे आलेल्या फांद्या कापून त्याची कलमं तयार करून त्या जागी रोवली.
मग आम्ही आईच्या भांडीधुण्याच्या जागे पासून जरा दूर आळूचे गड्डे लावले. बाजुलाच मातीचे चौकोनी वाफे तयार करून कोंथीबीर, मेथी बिया पेरल्या. मातीच्या सरी बनवून त्यात गवार, भेंडी, वांगी एका वाफ्यात तर एका वाफ्यात दोडका, कारली, काकडी, घेवडावेलाचे बी रोवले. नियमित या वाफ्यात पाणी सोडले, तण वाढू न देण्याची काळजी घेतली. एक- दोन महिन्यातच आमच्या घराच्यापरसबागेत भाजीचा मळा फुलला. अर्थात या कामात आम्हाला आमच्या आजी-आजोबांनी खूप मदत केली. सरीमधे बी कसेलावायचे. मातीच्या वाफ्यात कोथींबीरचे बी म्हणजे धने, मेथ्या-मेथीचे बी कसे पेरायचे, वरून माती कशी सारायची, वापसा कसाफुलवायचा, पाणी कधी व किती प्रमाणात दयायचे हे सांगितले. मग काय आम्ही बालमित्रांनी घेतलेली मेहनत फळास आली. आताआमच्या सर्वांच्या घरात या भाजीच्या मळ्यातील भाजीचीच भाजी बनू लागली. शेजारच्या काकू, आत्या, मावशी, अडलंनडलं तरकोथींबीर भाजी मागायला येवू लागल्या.
आणि एक दिवस गंमतच झाली आमच्या या बागेला नजर लागली. शेजारच्या म्हेत्रे काकूच्या गोठ्यातल्या वासराने आमची बाग तुडवली. पण आजोबांच्या मदतीने पुन्हा आम्ही त्या झाडांना, वेलींना आधार देऊन ती पहिल्यासारखी फुलवली. आम्ही ती बागफुलवत असताना एके दिवशी आम्ही शाळेत गेल्यावर, घराला कुलूप पाहून, आमच्या शेजारच्या गणफुले काकाच्या वात्रट, खोडकरबाळुने आम्ही शाळेत गेल्यावर परसबागेतील भाजी चोरली व काकडी व दोडक्याचे दोन चार वेल उपटून टाकले. मात्र हे रस्त्यावरून जाणाऱ्या दिनूने पाहिले व आम्ही घरी आल्यावर आम्हाला सांगितले. खरंतर आम्हाला त्याचा खूप राग आलेला त्याने न विचारताएकतर भाजी चोरली व वेलही उपटले, मग आजोंबानी त्याची चांगलीच कान उघडणी केली.
आजोबांनी आम्हाला शांत राहण्यास सांगितले त्याला मार दिला तर तो अधिकच चवताळेल व रागाने पुन्हा काहीतरी नुकसान करेल त्यापेक्षा आपण युक्तीने त्याला शिक्षादेऊ आजोबा म्हणाले. मग त्यांनी त्याच्याकडून अख्खी परसबाग दिवसभर खुरपून घेऊन झाडांना पानी देऊन घेतले. आजोबांनीत्याला परत जर असं केलं तर मग तुला मार दिल्याशिवाय सोडणार नाही असा धाक दिला. त्यादिवसापासून त्याने झाडांची पानं वफुलं तोडण्याची हिम्मत केलीच नाही उलट तो आमचा मित्र बनून आम्हाला मदत करू लागला व त्याच्या परसबागेतही आमचं पाहून, आमच्याकडून शिकून, पाहून छानशी परसबाग फुलवली. चला तर मुलांनो मग आपणही आपल्या परसबागेत अशी छोटीशी बागफुलवूया.
तनुजा ढेरे


1 comment:
कमेंट
Post a Comment