Tuesday, 25 August 2020

परसबाग










आम्हा मुलांना लहानपणी भातुकलीचाबाहुलाबाहुलीचा खेळ खेळायचं वेड नव्हतं तर झाडाची विविधरंगीविविध आकाराची पानंफुलं गोळा करायचीत्याचे हार गजरे बनवायचे याचं वेड होतंशाळा सुटल्यावर गावाबाहेरच्या डोंगरावर संध्याकाळी आम्ही तासन्तास भटकायचोतेथील विविध प्रकारची गवतफुलेगवताचे तुरे गोळा करायचा छंदच जडला होता आम्हालाआणि मग याछंदातूनच आमच्या घरा समोरच्या अंगणात एक बाग फुलवायची ठरवलीअंगणात तशी आईने लहान लहान कुंड्यात शोभेची झाडंवेल लावलेले होतेत्याची इवली इवली पानंफुलंरंग पाहण्यात मजा यायची.  मग आम्ही मुलांनी अंगणाचा एक कोपरा हेरून तीजागा खुरप्याने तण काढूनखणून चांगली भुसभुशीत केलीछोटे छोटे खड्डे करून त्याला आळी केली  त्यात आजुबाजूच्याझाडांच्या डोळे आलेल्या फांद्या कापून त्याची कलमं तयार करून त्या जागी रोवली


आई बाबांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून वाचवलेल्या पैशाच्या छोट्या छोट्या कुंड्या आणल्या त्यात अंगणात वाढलेल्या अबोलीचंबीतुळशीच्या मंजुळा टाकल्याघरामागच्या बंगल्यातली शोभेची झाडं त्याच्या फांद्या आणून कुंडीत खोवल्या  माती चोपून पाणीदिलं आणि काय गंमत आम्ही लावलेली सारी कलमंरोपं चिकटली होतीथोड्याच दिवसात त्या कलमांना इवली इवली पानं फुटलीहोतीबिया रूजून तेथून हिरवे हिरवे कोंब बाहेर पडले होतेती रोपटी नंतर मोठी होऊन त्याला पानं फुलं आलीआम्हा मुलांचा आनंदगगनात मावेनाआमची ही आवड हा छंद पाहून मग आजोबांनी आम्हाला त्यांच्या बियांच्या पोटलीतून गवारदोडकीभेंडीयांच्याबिया दिल्या  परसदारातील जागाही रिकामी करून दिली


मग आम्ही आईच्या भांडीधुण्याच्या जागे पासून जरा दूर आळूचे गड्डे लावलेबाजुलाच मातीचे चौकोनी वाफे तयार करून कोंथीबीरमेथी बिया पेरल्यामातीच्या सरी बनवून त्यात गवारभेंडीवांगी एका वाफ्यात तर एका वाफ्यात दोडकाकारलीकाकडीघेवडावेलाचे बी रोवलेनियमित या वाफ्यात पाणी सोडलेतण वाढू  देण्याची काळजी घेतली.  एकदोन महिन्यातच आमच्या घराच्यापरसबागेत भाजीचा मळा फुललाअर्थात या कामात आम्हाला आमच्या आजी-आजोबांनी खूप मदत केलीसरीमधे बी कसेलावायचेमातीच्या वाफ्यात कोथींबीरचे बी म्हणजे धनेमेथ्या-मेथीचे बी कसे पेरायचेवरून माती कशी सारायचीवापसा कसाफुलवायचापाणी कधी  किती प्रमाणात दयायचे हे सांगितलेमग काय आम्ही बालमित्रांनी घेतलेली मेहनत फळास आलीआताआमच्या सर्वांच्या घरात या भाजीच्या मळ्यातील भाजीचीच भाजी बनू लागलीशेजारच्या काकूआत्यामावशीअडलंनडलं तरकोथींबीर भाजी मागायला येवू लागल्या

परसबाग


आणि एक दिवस गंमतच झाली आमच्या या बागेला नजर लागलीशेजारच्या म्हेत्रे काकूच्या गोठ्यातल्या वासराने आमची बाग तुडवलीपण आजोबांच्या मदतीने पुन्हा आम्ही त्या झाडांनावेलींना आधार देऊन ती पहिल्यासारखी फुलवलीआम्ही ती बागफुलवत असताना एके दिवशी आम्ही शाळेत गेल्यावरघराला कुलूप पाहूनआमच्या शेजारच्या गणफुले काकाच्या वात्रटखोडकरबाळुने आम्ही शाळेत गेल्यावर परसबागेतील भाजी चोरली  काकडी  दोडक्याचे दोन चार वेल उपटून टाकलेमात्र हे रस्त्यावरून जाणाऱ्या दिनूने पाहिले  आम्ही घरी आल्यावर आम्हाला सांगितलेखरंतर आम्हाला त्याचा खूप राग आलेला त्याने  विचारताएकतर भाजी चोरली  वेलही उपटलेमग आजोंबानी त्याची चांगलीच कान उघडणी केली.


आजोबांनी आम्हाला शांत राहण्यास सांगितले त्याला मार दिला तर तो अधिकच चवताळेल  रागाने पुन्हा काहीतरी नुकसान करेल त्यापेक्षा आपण युक्तीने त्याला शिक्षादेऊ आजोबा म्हणालेमग त्यांनी त्याच्याकडून अख्खी परसबाग दिवसभर खुरपून घेऊन झाडांना पानी देऊन घेतलेआजोबांनीत्याला परत जर असं केलं तर मग तुला मार दिल्याशिवाय सोडणार नाही असा धाक दिलात्यादिवसापासून त्याने झाडांची पानं फुलं तोडण्याची हिम्मत केलीच नाही उलट तो आमचा मित्र बनून आम्हाला मदत करू लागला  त्याच्या परसबागेतही आमचं पाहूनआमच्याकडून शिकूनपाहून छानशी परसबाग फुलवलीचला तर मुलांनो मग आपणही आपल्या परसबागेत अशी छोटीशी बागफुलवूया.


तनुजा ढेरे